logo

Monday 23rd of January 2017

Books

Horizontal SlideShow Module v1.8 by JT.

Polls

Which Book of ASG you like most?
 

Veblen - Arthat PDF Print E-mail
Written by deepa   
Wednesday, 05 January 2011 12:44

Veblen

व्हेब्लिन (1857-1929)

क्लासिकल अर्थतज्‍ज्ञांना `प्रत्येक माणूस जर स्वहितासाठी आणि विवेकानं वागायला लागला तर संपूर्ण समाजाचं भलं होईल' असं वाटे. या रस्सीखेचीत मग काही लोक वर जातील, काही खाली उरतील, पण त्याला काही इलाज नाही, असंही -याचजणांना वाटे. मार्जिनॅलिस्ट मंडळींनी तर माणूस म्हणजे सुखदुःखाचं (पेन अँड फ्लेझर) एक यंत्रच आहे, असं समजून आपल्या थिअरीज उभ्या केल्या होत्या. पण व्हेब्लिननं याच कल्पनेला तडा दिला.

प्रत्येकजण फक्त स्वार्थाकरता झटतो आणि तसं केल्यानंच समाज एकसंध रहातो हेच त्याला मान्य नव्हतं. त्यानं यासाठी अमेरिकेतले रेड इंडियन्स, जपानमधले आयनस, ऑस्ट्रेलियामधले बुशमन आणि निलगिरी पर्वतातले टोडा लोक अशा अनेक आदिवासींची उदाहरणं घेतली. या समाजामधे उच्चनीच फारसं नव्हतं, आयतोबा आणि शोबाजीसाठी उधळपट्टी करणारा `लिझर क्लास' नव्हता, सगळेच काम करायचे, वाटून खायचे, एकत्र रहायचे. वैयक्तिक नफा किंवा स्वार्थ यांच्यामुळे ही मंडळी काम करत नसत. त्यांच्यात स्पर्धा होती; पण ती जास्त चांगलं काम रु र्वांकडून वहाव्वा मिळवण्याची. पण पुढे पुढे बळाचा वापर करन संपत्ती गोळा करणं आणि त्यावर आराम करणं आदरणीय ठरायला लागलं. याबरोबर समाजाची मूल्यं बदलली. श्रमाची प्रतिष्ठा खालावली. झटपट काहीही रु पैसा मिळवणा-यांची प्रतिष्ठा वाढली. कष्ट उपसणारे श्रमिक मग बंड रु का उठत नाहीत? व्हेब्लिनच्या मते तसं होतं याचं कारण कामगारवर्ग स्वतःला या आयतोबा वर्गाच्या विरुद्ध समजतच नाही. उलट त्यांच्यासारखंच तो वागायला, बोलायला बघतो. कामगारांनाच मुळी श्रम रु जगणं हे कमीपणाचं वाटून आयतेपणानी जगणं हे जास्त उच्चभ्रू वाटायला लागतं. त्यामुळे या वरिष्ठ वर्गाच्या विरुद्ध दंड थोपटून उभं रहाण्याऐवजी तो त्याच वर्गात जा बसण्याची धडपड करायला लागतो. आणि यातूनच मग सामाजिक क्रंतीच्या ऐवजी स्थैर्य निर्माण होतं.

नॉर्वेतून अमेरिकेत स्थलांतर केलेल्या एका शेतकरी कुटुंबात 1857 साली व्हेब्लिन जन्मला. त्याची रहाणी अगदी साधी होती. घरीच शिवलेले कपडे तो घाले. केसांचा मधोमध ^ आकाराचा भांग तो पाडे. अतिशय अव्यवस्थितपणे वाढलेल्या मिशा, दाढी आणि इस्त्र केलेल्या सुटाला ठिकठिकाणी सेफ्टी पिन्स लावलेल्या असा त्याचा अवतार असायचा. पाय उंच करन तो लांबलांब पावलं टाकत झपाझप चालायचा. त्याचे चिकित्सक डोळे आजुबाजूच्या लहानसहान गोष्टी टिपायचे, पण तरीही तो जसा काही या जगातला नसून बाहेरनच कुठूनतरी आल्यासारखा वागे.

व्हेब्लिननं येल विद्यापीठातून इमॅन्युअल कँटच्या तत्त्वज्ञानावर डॉक्टरेट मिळवूनही नोकरी मिळाल्यानं मग नुसतंच भटक, वाच, थोडंफार लिही किंवा लहानमोठय़ा नोक-या कर असं सात वर्ष केलं! अनेक मुली आणि बायका त्याच्या सतत प्रेमात पडायच्या! आणि त्यासाठी तो खास प्रयत्नही फारसा करायचा नाही. ``मुलीच आपणहून माझ्याकडे येतात, त्याला मी काय रु?'' असं तो म्हणायचा. अनेकांनी त्याच्यावर प्रेम केलं, त्याचा आदर, कौतुक केलं, पण त्याला कोणीही मित्र नव्हता. त्याच्या अनेक प्रेमप्रकरणांविषयीअनेक (दंत)कथा प्रसिद्ध होत्या. हार्वर्डमधे एकदा प्राध्यापकाच्या नोकरीसाठी म्हणे तो मुलाखत द्यायला गेला. मुलाखत झाल्यानंतर विद्यापीठाचा प्रेसिडेंट . लॉरेन्स लॉवेल यानं त्याला रात्री जेवणाचं आमंत्रण दिलं. त्यावेळेला जेवताना लॉवेल त्याला म्हणाला, तुझा इंटरह्यू चांगला झाला, पण माझ्यासमोर एक प्रश्न आहे. आणि माझ्या अर्थशास्त्र विभागातल्या इतर प्राध्यापकांमधे त्याची चर्चा चालू आहे. `तू जर का इथे आलास तर त्यांच्या बायकांचं काय होणार?' असे विचार डोक्यात आल्यामुळे त्या सगळ्या प्राध्यापकांना असुरक्षित वाटतंय. त्यावेळेला व्हेब्लिन लॉवेलला म्हणाला, तुम्ही त्याची मुळीच काळजी करु नका! माझं त्या सगळ्या बायकांचं अगोदरच निरीक्षण अगोदरच करून झालंय! मला इंटरेस्ट वाटेल अशी त्यात एकही नाहीये. अर्थातच त्याला ती नोकरी मिळाली नाही हे सांगायला नकोच! हा किस्सा ` हिस्ट्री ऑफ इकॉनॉमिक्स' या पुस्तकात गॅलब्रेथनं दिलाय आणि बहुदा ही दंतकथाच असावी असंही म्हटलंय.

कालांतरानं `युनिव्हर्सिटी ऑफ शिकागो'मधे मग व्हेब्लिननं 14 वर्ष शिकवलं. पण त्याला शिक्षणक्षेत्रातलं राजकारण जमलं नाही आणि त्यातून तो शिकवायचा खूपच वाईट. विषय सोडून तो कुठेही भरकटायचा. त्यामुळे कित्येकजण वर्गातून सटकायचेच. पण उरलेल्यांनाही तो विचित्र बोलून घालवण्याचा प्रयत्न करी. एका धार्मिक विद्यार्थ्याला त्यानं,``एका चर्चची किंमत किती बियरइतकी होईल?'' असं विचारलं. मग तो कशाला परत लेक्चरला येतोय? शेवटी एकदा तर एकच विद्यार्थी उरला होता!

व्हेब्लिन सगळ्या विद्याथ्यना कसेही प्रश्न सोडवले तरी `सी' ग्रेडच देई. पण एखाद्या विद्यार्थ्याला पुढच्या इयत्तेत जाण्यासाठी `सी' ग्रेडऐवजी `'ची गरज असेल, तर व्हेब्लिन काहीही मागेपुढे बघता चटकन् ती ग्रेड बदले. एका मुलीनं त्याला त्याच्या `टी.बी.' या इनिशियल्सविषयी विचारलं असताना `टेडी बेअर' असं त्यानं उत्तर दिलं होतं! मग तिनंही त्याला `टेडी बेअर' म्हणूनच हाक मारायला सुरवात केली. ते त्याला चालायचं. पण इतरांनी कोणी तशी हाक मारलेलं त्याला खपायचं नाही. अनेकांनी त्याच्यावर प्रेम केलं, त्याचा आदर, कौतुक केलं, पण त्याला कोणीही मित्र नव्हता. `व्हेब्लिनला सव्वीस भाषा येतात' असं त्याच्याविषयी बोललं जाई. `` तू कुठलीतरी गोष्ट गंभीरपणे घेतोस का ?'' असं कुणी विचारल्यावर तो म्हणायचा,`` हो, पण हे कुणाला सांगू नकोस''.

डॉर्फमननं व्हेब्लिनच्या जीवनशैलीविषयी खूपच गंमतशीर लिहून ठेवलंय. त्याच्या घरी त्यानं बरीच लाकडी खोकी आणून ठेवली होती. त्यांचाच तो टेबलं आणि खुर्च्या म्हणून वापर करे. घर व्यवस्थित ठेवणं म्हणजे त्याला वेळेचा अपव्यय वाटे. खरकटी भांडी तो तशीच दिवसेंदिवस ठेऊन देई. आणि मग एके दिवशी त्यावर मोठय़ा पाईपनं पाणी ओतून ते साफ करे. तो प्रचंडच विक्षिप्‍त होता. घरी टेलिफोन बसवायला त्याचा विरोध होता. तो फारसं बोलतही नसे. कित्येकदा त्याच्याकडे पाहुणे आले असताना तासनतास बसलेले असत. त्यानंतर तो क्वचित एखादा शब्द बोले. व्हेब्लिननं संपादित केलेल्या एखाद्या नियतकालिकातल्या लेखाविषयी त्याचं मत विचारलं तर तो ``खरंतर दर पानात 400 शब्द असतात, पण या लेखात ते फक्त 375 आहेत'' अशा -हेची विचित्र उत्तरं देई. 1888 साली त्यानं लग्न केलं. त्याच्या बायकोनं अनेकदा त्याच्या बेभरवशामुळे त्याला सोडलं. आणि ती अनेकदा त्याच्याकडे परतलीही! पण व्हेब्लिनही विचित्रासारखंच वागे. कित्येकदा मध्यरात्री तो जंगलातून वाट काढत तिच्या घरी सांगताच दत्त म्हणून उभा राही आणि हातातला काळा मोजा दाखवून `हा तुझाच आहे का?' असं विचारे.

त्यानं दोन प्रसिद्ध पुस्तकं लिहिली. त्यातलं ` थिअरी ऑफ लिझर क्लास' खूपच गाजलं. पहिल्यांदा ते त्यानं आपल्या विद्यार्थ्यांना वाचून दाखवलं. तेव्हा ``हे पुन्हा चांगल्या भाषेत लिहिण्याची गरज आहे'' असं त्याला त्यांनी सांगितलं. आयतोबा वर्गाची फक्त यात टर उडवलीय असंच वरकरणी कुणालाही वाटलं असतं. कारण त्यानं यात श्रीमंत `लिझर क्लास'ची चांगलीच खरडपट्टी काढली होती. माणूस फक्त स्वहितासाठी आणि विवेकानं वागत नाही, स्वतःला खरंच काय उपयोगी आहे ते बघून फक्त उपयुक्ततेप्रमाणे तो वस्तू खरेदी करत नाही, तर सवय, अंधश्रद्धा, प्रतिष्ठा, शोबाजी अशा अविवेकी गोष्टींवरून तो काय विकत घ्यायचं ते ठरवतो. इतरांवर छाप कशानं पडेल ते तो खरेदी करतो. त्याची प्रतिष्ठा वाढवण्यासाठी तो अनेक गोष्टी विकत घेतो. शिवाय तो इतरांना महागडय़ा भेटवस्तू द्यायला लागतो. कारण त्यावरन त्याची संपत्ती आणि समाजातलं स्थान लोकांना कळतं. या सगळ्याला व्हेब्लिन `दिखाऊ खर्च (कॉन्स्पिक्युअस कन्झम्शन)' म्हणतो. अशा उधळपट्टीमुळे फक्त मित्रांमधे किंवा शेजा-यांमधे असूया निर्माण होते. मग तेही तसाच खर्च करायला लागतात आणि आपण जास्त महाग गाडी घेतली की मग तेही तशीच घ्यायचा प्रयत्न करतात. आणि यात जरी सगळे कर्जबाजारी झाले तरी ही चढाओढ मग चालूच रहाते. म्हणजे वस्तूच्या खरेदीमुळे समाधान आणि आनंद वाढण्याऐवजी शोबाजीच वाढते. हे पूर्वीच्या उपयुक्ततावादी आणि विवेकवादी खरेदीच्या तत्त्वांच्या विरुद्ध होतं.

त्याचं `लिझर क्लास' 1899 साली बाहेर पडल्यानंतर त्याला एक चांगला अर्थशास्त्रज्ञ म्हणून नव्हे तर उपरोधात्मक लेखक म्हणूनच जास्त प्रसिद्धी मिळाली. रॅडिकल आणि बुद्धिजीवी मंडळीनी त्याच्यावर स्तुतीचा वर्षाव केला. पण इतर अर्थतज्‍ज्ञांनी त्याच्याकडे `तो समाजवादी तर नाही ना?', म्हणून साशंक नजरेनं बघायला सुरवात केली. कारण एका वाक्यात तो मार्क्सची खूप स्तुती करे तर पुढच्याच वाक्यात तो त्यावर टीका करे. कित्येकदा भावनिक वाक्यानंतर एकदम काहीतरी विनोदी असं लिहून जाई, त्यामुळे वाचक बुचकळ्यात पडत.

1904 साली व्हेब्लिनचं `दी थिअरी ऑफ बिझिनेस एंटरप्राईज' नावाचं दुसरं पुस्तक बाहेर आलं. सुसूत्रपणे चालणारी यंत्रं आणि त्यांचं नियोजन करणारे इंजिनिअर्स यांच्यामुळेच ही व्यवस्था जास्त चांगली चालू शकते. पण भांडवलदार हे फक्त नफ्याच्या मागे असल्यामुळे ही व्यवस्था अकार्यक्षमपणे चालायला लागते असं त्यानं मांडलं, आणि हे बदलायला पाहिजे असंही मांडलं.

व्हेब्लिनच्या `दी इंजिनियर्स ऍड दी प्राईस सिस्टिम' आणि `ऍबसेंटी ओनरशीप अँड बिझिनेस एंटरप्राईज इन रिसेंट टाईम्स केस ऑफ अमेरिका' या दोन पुस्तकातून त्यानं त्याला अपेक्षित असलेल्या क्रांतीच्याविषयी जास्त सखोल लिहिलं. इंजिनियर्स मंडळींचं उत्पादनव्यवस्थेवरती नियंत्रण असेलच; पण भांडवलदाराची वाढणारी नफेखोरी लक्षात आल्यानं सगळं ताब्यात घेउन इंजिनिअर्स ही यंत्रणा चालवायला लागतील. हे जर असं झालं नाही तर भांडवलदार लांडय़ालबाडय़ा करत एकमेकांना शेवटी नष्ट करतील असं त्यानं मांडलं. त्यावेळी `रॉबर बॅरॉन'चा काळ होता. अमेरिकेत अनेक भांडवलदार चक्क लूटमार, लाच, फसवेगिरी अशा गैरमागचा वापर करुन पैसा मिळवत. त्यामुळे व्हेब्लिनला असं वाटावं यात नवल काहीच नव्हतं. व्हेब्लिनचे हे विचित्र विश्लेषण थोडसं सेंट सिमाँसारखंच होतं.

1906साली शिकागो सोडल्यावर व्हेब्लिननं अनेक कॉलेजं बदलली. सगळीकडून काही काळातच त्याची हकालपट्टी होई. शेवटी तो स्टॅनफर्डला गेला. तिथंही तो विद्वान पण विक्षिप्‍त म्हणूनच ओळखला जायला लागला.

व्हेब्लिननं बायकोनं 1911 साली त्याला घटस्फोट दिला. त्यानंतर तो `युनिर्व्हसिटी ऑफ मिसुरी' इथं गेला. त्याकाळी डॅव्हेनपोर्ट या एका प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञाच्या घरी तो राहताना बेसमेंटमध्येच राही आणि दाराऐवजी खिडकीतूनच उडय़ा मारु आत-बाहेर करे. त्यानं `दी हायर लर्निंग इन अमेरिका' हे अमेरिकन शिक्षणपद्धतीवर टीका करणारं पुस्तक लिहिलं. यापुढे त्याने अनेक उद्योग केले, पण सगळेच फसले. युद्ध चालू झाल्यावर `इम्पिरियल जर्मनी' नावाचं पुस्तक त्यानं लिहिलं. खरं म्हणजे जर्मनीविरुद्ध प्रचार करण्यासाठी त्या पुस्तकाचा वापर प्रचारखात्याला करायचा होता. पण टपालखात्याला त्या पुस्तकात इंग्लड आणि अमेरिकेच्या विरुद्ध एवढा मजकूर सापडला की त्यांनी त्या पुस्तकावर बंदीच आणली. 1914 साली त्यानं दुसरं लग्न केलं. पण त्याच्या बायकोला मानसिक आजारामुळे इस्पितळात दाखल करावं लागलं होतं. त्याचे मित्रही आता खूप दूर गेले होते. त्याच्या लिखाणाची अर्थतज्‍ज्ञ चेष्टा करत आणि इंजिनियर्सना तर त्याचा पत्ताही नव्हता. आता त्यानं सत्तरी ओलांडली होती. त्याला स्तुतीची एवढी सवय झाली होती, की त्यानं काही शिष्यांना त्याला स्तुतीची पत्रं पाठवण्यासाठी चक्क नेमलं होतं!

प्रत्यक्ष पहिलं महायुद्ध चालू झाल्यावर फूड ऍडमिनिस्ट्रेशन खात्यात व्हेब्लिनला कुठलंतरी कमी महत्त्वाचं काम देण्यात आलं. 1918 साली तो न्यूयॉर्कला आला आणि `डायल' नावाच्या उदारमतवादी नियतकालिकासाठी लेखन करायला लागला. पण त्यामुळे `डायल'चा खप कमीच व्हायला लागला. `न्यू स्कूल फॉर सोशल रिसर्च' इथे त्यानं लेक्चरर म्हणून काम सुरु केलं, पण तिथंही विद्यार्थी पळून जायला लागले.

प्रचंड प्रसिद्धी आणि कुप्रसिद्धी यानी व्हेब्लिनची कहाणी व्यक्त होत होती. व्हेब्लिन आणि त्याच्या थिअरीज यांच्यावर प्रेम करणारी जशी शेकडो माणसं होती तशीच त्याच्या विरुद्धही अनेक होती. `न्यू स्कूल'च्या लॉबीमध्ये जेव्हा त्याचा पुतळा उभा केला तेव्हा अनेक लोकांनी त्यावर टीका केली. इतकी की शेवटी तो वाचनालयातल्या एका कोप-यात ठेवावा लागला. 1917 सालच्या रशियन क्रांतीनंतर तिथेतरी इंजिनियर्स आणि तंत्रज्ञ यांचं युग उदयाला येईल असं त्याला वाटलं. पण तसंही झाल्यानं तो खूप निराश झाला. यानंतर मात्र तो मृत्यूचीच वाट बघायला लागला.

उशिरा का होईना, व्हेब्लिनला `अमेरिकन इकॉनॉमिक असोशिएशन'च्या अध्यक्षपदाचं पद देउढ केलं पण तेही त्यानं नाकारलं. शेवटी तो कॅलिफोर्नियाला एका अतिशय जुनाट घरात रहायला लागला. जाडेभरडेच कपडे तो तिथेही घालत असे. घरात अगदी शेवाळ्यापासून ते इकडून तिकडे पळणा-या उंदरांपर्यंत सगळं कसं एकत्र नांदायचं. या सगळ्यात व्हेब्लिन एकटा बसून एकटक कुठेतरी बघत कशावर तरी विचार करीत बसे.

1929 सालच्या `ग्रेट क्रॅ'च्या काहीच महिने अगोदर व्हेब्लिन मरण पावला. त्यानं त्याच्या मृत्यूपत्राबरोबरच पेन्सिलनं खरडलेलं एक पत्र लिहून ठेवलं होतं. ``माझ्यानंतर माझं कुठलंही चित्रं, पुतळा, चरित्र, मृत्यूलेख, आठवणी, माझी पत्रं, मला आलेली पत्रं यापैकी काहीही प्रसिद्ध करू नये, असल्यास नष्ट करावीत.'' नेहमीप्रमाणेच या पत्राकडे दुर्लक्ष केलं गेलं. आणि त्याचं लेखी साहित्य ताबडतोब प्रकाशित करण्यात आलं!

 

Created by Apoorv Deshmukh  Designed by Deepa Deshmukh